Friday, 24 July 2015

हल्ली आनंदी आणि समाधानी माणसं दुर्मिळ झाली आहेत...

कोणाशी जरा बोलायला जा,
तक्रारींचा पाढा सुरु झालाच म्हणून समजा

‘माझ्याकडे वेळ नाही,
माझ्याकडे पैसे नाहीत,
स्पर्धेत टिकाव कसा लागेल,
आज पाऊस पडतोय,
माझा मूड नाही !’....

आनंद ‘लांबणीवर’ टाकायच्या या सगळ्या सबबी आहेत...

काही गोष्टी करून आपल्यालाच आनंद मिळणार आहे...
पण आपणच तो आनंद घ्यायचा टाळतोय

Isn't it strange ?

मोगऱ्याच्या फुलांचा गंध घ्यायला कितीसा वेळ लागतो ?

सूर्योदय-सूर्यास्त पाहायला किती पैसे पडतात ?

आंघोळ करताना गाणं म्हणताय,

कोण मरायला येणारे तुमच्याशी स्पर्धा करायला ?

पाऊस पडतोय ?
सोप्पं आहे - भिजायला जा !

अगदी काहीही न करता गादीत लोळत राहायला तुम्हाला 'मूड' लागतो ?

माणूस जन्म घेतो त्यावेळी त्याच्या हाताच्या मुठी बंद असतात....

परमेश्वराने एका हातात
'आनंद'
आणि एका हातात
'समाधान'
कोंबून पाठवलेलं असतं....

माणूस मोठा होऊ लागतो,
वाढत्या वयाबरोबर
'आनंद' आणि 'समाधान'
कुठे-कुठे सांडत जातात....

आता 'आनंदी' होण्यासाठी
‘कोणावर’ तरी,
‘कशावर’ तरी
अवलंबून राहावं लागतं....

कुणाच्या येण्यावर...
कुणाच्या जाण्यावर...
कुणाच्या असण्यावर...
कुणाच्या नसण्यावर...

काहीतरी मिळाल्यावर...
कोणीतरी गमावल्यावर...
कुणाच्या बोलण्यावर...
कुणाच्या न बोलण्यावर...

खरं तर,
'आत' आनंदाचा न आटणारा झरा वाहतोय....

कधीही त्यात उडी मारावी आणि मस्त डुंबावं...

इतकं असून...

आपण सगळे त्या झऱ्याच्या काठावर उभे आहोत,
पाण्याच्या टँकरची वाट बघत...
जोवर हे वाट बघणं आहे तोवर ही तहान भागणं अशक्य !....

इतरांशी तुलना करत
आणखी पैसे,
आणखी कपडे,
आणखी मोठं घर,
आणखी वरची 'पोजिशन',
आणखी टक्के.. !

या 'आणखी' च्या मागे
धावता धावता त्या
आनंदाच्या झऱ्यापासून
किती लांब आलो आपण !....
💐एक छान गोष्टं वाचनात आली...


एकदा एका जंगलात एक हरीणी बाळाला जन्मं देणार असते...

 पण ती ज्या ठीकाणी बसलेली असते तिथे जवळच एक वाघ तिच्यावर नजर ठेवून असतो...

एका बाजूला एक शिकारी तिच्यावर बंदूक रोखून उभा असतो...

 आणि जवळच जंगलात वणवा पेटलेला असतो...

 सगळ्या बाजूने दिसणार्या या संकटांपैकी एकतरी संकट तिला गिळून टाकेल याची तिला खात्री असते...

 तो शिकारी बंदुकीतून गोळी सोडतो....
वाघ जोरात झेप घेतो...


आणि तितक्यात वीज चमकते...
त्या शिकार्याचं लक्षं वेधलं जातं... आणि ती गोळी त्या वाघाला लागते...

वीज चमकून गडगडाट होतो आणि पाऊस सुरु होतो...
त्यामुळे वणवाही विझतो...
आणि या सगळ्या गोष्टी होत असताना ती हरिणी हळूच एका लहानश्या हरणाला जन्मं देते...

माणसाचं आयुष्य हे असंच असतं... त्याच्या हातात काहीच नसतं...
आपण फक्तं प्यादी असतो या पटावरची...

कर्ता करविता असतो तो ईश्वर...
एक एक वाटत असताना कुठल्या क्षणी काय होईल काहीच सांगता येत नाही...

मारणाराही तोच असतो आणि तारणाराही तोच...

कर्माचा सिद्धांत हा कीतीही खरा असला तरी शेक्सपिअरचं एक वाक्यं खूप काही सांगून जातं...
 'Behind every misfortune there is a crime... But behind every crime there is a misfortune...!'...

आयुष्य हे असंच असतं...
कुणाला दोष द्यावा आणि कुणाचं कौतुक करावं...

दोन्ही एकाच रथाची चाकं... कुठलं खड्डयात अडकणार आणि कुठलं वर टांगून राहणार हे ठरवणारा मात्र तोच...

'समुद्रात बुडून त्याचा म्रुत्यु झाला'...पण त्याच्या मनातून समुद्राकडे तो त्याक्षणी कसा ओढला गेला? कोण सांगेल?

'चाळीस घरांच्या ढिगार्याखाली गाडलं गेलेलं सहा महीन्यांच बाळ,  30 तासांनंतरही तसच छान हसत खेळत सापडतं'...
त्याला अलगदपणे त्या ढिगार्यातही कुशीत घेणारं कोण असतं?

'नेहमीच्याच रस्त्याने जाणारी एक बस अचानक एक दिवस दरीत कोसळते.'
तिला दरीत ढकलणारं असतं कोण? वारा? की ड्रायव्हर? की ड्रायव्हरच्या डोळ्यासमोर अचानक आलेला अंधार? कोण सांगेल?

एका मुलाच्या रोजच्या नेहमीच्या ट्रेनमधे बाम्बस्फोट होतो... पण तो त्यादिवशी ऑफिसला गेलेलाच नसतो... त्यामुळे तो वाचतो...
ऑफिसला न जाण्याची इच्छा त्याला त्याच दिवशी का होते? कोण सांगेल?

त्या हरिणीच्या बाळाचा जन्मं होताना अचानक वीज का चमकली?
कोण सांगेल? कोण सांगेल कोण??

कुणीच नाही...
हे असंच असतं...
भक्तीने रुजवलेलं ...
प्रेमाने सावरलेलं...
आसक्तीने बुडवलेलं...
कर्माच्या चक्रात अडकलेलं...

ईश्वराने लिहीलेलं ...  आपलं आयुष्यं...!
🌺🌺💐💐🌺🌺🌺
💐एक छान गोष्टं वाचनात आली...


एकदा एका जंगलात एक हरीणी बाळाला जन्मं देणार असते...

 पण ती ज्या ठीकाणी बसलेली असते तिथे जवळच एक वाघ तिच्यावर नजर ठेवून असतो...

एका बाजूला एक शिकारी तिच्यावर बंदूक रोखून उभा असतो...

 आणि जवळच जंगलात वणवा पेटलेला असतो...

 सगळ्या बाजूने दिसणार्या या संकटांपैकी एकतरी संकट तिला गिळून टाकेल याची तिला खात्री असते...

 तो शिकारी बंदुकीतून गोळी सोडतो....
वाघ जोरात झेप घेतो...


आणि तितक्यात वीज चमकते...
त्या शिकार्याचं लक्षं वेधलं जातं... आणि ती गोळी त्या वाघाला लागते...

वीज चमकून गडगडाट होतो आणि पाऊस सुरु होतो...
त्यामुळे वणवाही विझतो...
आणि या सगळ्या गोष्टी होत असताना ती हरिणी हळूच एका लहानश्या हरणाला जन्मं देते...

माणसाचं आयुष्य हे असंच असतं... त्याच्या हातात काहीच नसतं...
आपण फक्तं प्यादी असतो या पटावरची...

कर्ता करविता असतो तो ईश्वर...
एक एक वाटत असताना कुठल्या क्षणी काय होईल काहीच सांगता येत नाही...

मारणाराही तोच असतो आणि तारणाराही तोच...

कर्माचा सिद्धांत हा कीतीही खरा असला तरी शेक्सपिअरचं एक वाक्यं खूप काही सांगून जातं...
 'Behind every misfortune there is a crime... But behind every crime there is a misfortune...!'...

आयुष्य हे असंच असतं...
कुणाला दोष द्यावा आणि कुणाचं कौतुक करावं...

दोन्ही एकाच रथाची चाकं... कुठलं खड्डयात अडकणार आणि कुठलं वर टांगून राहणार हे ठरवणारा मात्र तोच...

'समुद्रात बुडून त्याचा म्रुत्यु झाला'...पण त्याच्या मनातून समुद्राकडे तो त्याक्षणी कसा ओढला गेला? कोण सांगेल?

'चाळीस घरांच्या ढिगार्याखाली गाडलं गेलेलं सहा महीन्यांच बाळ,  30 तासांनंतरही तसच छान हसत खेळत सापडतं'...
त्याला अलगदपणे त्या ढिगार्यातही कुशीत घेणारं कोण असतं?

'नेहमीच्याच रस्त्याने जाणारी एक बस अचानक एक दिवस दरीत कोसळते.'
तिला दरीत ढकलणारं असतं कोण? वारा? की ड्रायव्हर? की ड्रायव्हरच्या डोळ्यासमोर अचानक आलेला अंधार? कोण सांगेल?

एका मुलाच्या रोजच्या नेहमीच्या ट्रेनमधे बाम्बस्फोट होतो... पण तो त्यादिवशी ऑफिसला गेलेलाच नसतो... त्यामुळे तो वाचतो...
ऑफिसला न जाण्याची इच्छा त्याला त्याच दिवशी का होते? कोण सांगेल?

त्या हरिणीच्या बाळाचा जन्मं होताना अचानक वीज का चमकली?
कोण सांगेल? कोण सांगेल कोण??

कुणीच नाही...
हे असंच असतं...
भक्तीने रुजवलेलं ...
प्रेमाने सावरलेलं...
आसक्तीने बुडवलेलं...
कर्माच्या चक्रात अडकलेलं...

ईश्वराने लिहीलेलं ...  आपलं आयुष्यं...!
🌺🌺💐💐🌺🌺🌺
आपण ह्यातून कोणाला निवडाल?……


मोठ्यांच्या रात्रीच्या शाळेत एके दिवशी मानसशास्त्राचे शिक्षक विध्यार्थ्यांना एक खेळ
खेळण्यास सांगतात.

सर्वजन उत्सुकतेने विचारतात
"कोणता खेळ सर?"

शिक्षक एका विध्यार्थ्याला
मदत करायला विनंती करतो.

 संगीता नावाची एक
स्त्री पुढे येते. .

शिक्षक तिला फळ्यावर तिच्या आयुष्यातील सर्वात
महत्वाच्या अश्या ३० व्यक्तींची नावें लिहायला सांगतात.

संगीता तिच्या घरातील, नातेवाईकांची,  मित्र-मैत्रिणींची
आणि शेजाऱ्यांची मिळून अशी ३० नावें फळ्यावर लिहिते.

शिक्षकाने नंतर तिला त्यातील तीन अशी नावें पुसून
टाकण्यास सांगितली कि जी तिच्या
दृष्टीकोनातून तेवढी महत्वाची नाहीत.
संगीताने
आपल्या मित्रांची नावें पुसली.

आता शिक्षकाने
तिला ५ आणखीन नावें पुसण्यास सांगितली आणि
ह्या खेपेस तिला आपल्या शेजाऱ्यांची नावें
पुसावायास लागली.

हा सिलसिला असाच पुढे
चालू राहिला जोपर्यंत फळ्यावर फक्त चार नावें
पुसायची बाकी राहिली होती.

जी चार नावें संगीताच्या दृष्टीने सर्वात महत्वाची
ठरली ती होती - आई,वडील,नवरा आणि मुलगा.

संपूर्ण वर्ग आता निस्तब्ध झाला होता कारण
त्यांना कळून चुकले होते कि ह्यापुढचा खेळ
संगीताला फार कठीण जाणार आहे.

 तिला आता
सर्वात कठीण असा निर्णय घेणे भाग पडणार आहे.

शिक्षकाने आता तिला तिच्यापुढील दोन नावें
पुसण्यास सांगितली.

मोठ्या नाईलाजाने आणि जड अंतःकरणाने तिने
आपल्या आई वडिलांची नावें पुसून टाकली. "

अजून एक
नांव पुसून टाक" शिक्षकाने फर्मावले.

 संगीता आता
पूर्णपणे हवालदिल, निराश झाली होती.

थरथरत्या हाताने तिने मुलाचे नाव पुसले
आणि
ओक्साबोक्शी रडायला लागली.


शिक्षकाने संगीताला तिच्या जागेवर जाऊन बसायला सांगितले.

थोड्या वेळाने जेव्हा तिचे दु:ख
आवरले तेव्हा तिला विचारले कि आई, वडील वा
मुलगा ह्यापैकी एकाचे नाव तिने का नाही ठेवले

तिच्या जीवनातील सर्वात महत्वाची व्यक्ती
म्हणून नवऱ्याऐवजी, ती आई किंवा वडिलांचे नाव ठेवू
शकली असती

कारण त्यांनी तिला जन्म देऊन
लहानाचे मोठे केले होते किंवा ज्याला तिने जन्म
दिला अशा तिच्या मुलाचे नाव ती शेवटी ठेवू
शकली असती.

मग नवराच का तिच्या जीवनातील
सर्वात महत्वाची व्यक्ती तिला वाटली?


टाचणी पडली तरी आवाज येईल अशी स्मशान
शांतता वर्गात पसरली होती आणि सर्वजण आता
संगीता काय उत्तर देते ह्याकडे कान टवकारून वाट बघत
होते.

संगीता तिच्या जागेवरून उठून उभी राहिली
आणि सावकाश म्हणाली

"एक दिवस माझे आई-वडील
मला सोडून जातील. माझा मुलगा सुद्धा मला सोडून
जाईल त्याच्या शिक्षणासाठी, नोकरीसाठी,  लग्ना नंतर वा
तत्सम काही कारणांमुळे.

तेव्हा शेवटी माझ्याबरोबर
राहील तो माझा नवरा ज्याच्या बरोबर मी माझे
उभे आयुष्य व्यतीत केले आहे.

" सर्वानी उभे राहून
टाळ्यांच्या गडगडातात तिच्या उत्तराचे स्वागत केले.

आपण आपल्या जीवनात अनेक व्यक्तींना भेटतो, ते
आपल्या आयुष्यात येतात आणि जातात.

काहीजण थोड्या वेळापुरते आपल्या बरोबर असतात तर
काहीजण शेवटपर्यंत आपल्या बरोबर असतात.

तेव्हा आपल्या सर्व नात्यांचा आदर राखणे हे आपले
आद्य कर्तव्य आहे पण त्याच बरोबर आपल्याला आपल्या
कुठल्या नात्यांना प्राधान्य दिले पाहिजे हे सुद्धा
समजले पाहिजे
एक सुंदर पत्र आईविना असलेल्या एका मुलाने आपल्या आईस

काव्य रूपाने लिहुन पाठविले आहे ते मला आवडले म्हणून मी तुम्हा सर्वांना पाठवित आहे.



प्रिय आईस,

पत्ता: देवाचे घर,

तुझा हात हवा होता
सदा माझ्या उश्यावर,

           थोपटून मला झोपवायला
           अचानक जाग आल्यावर.



मी अजून सुद्धा दचकून
जागा होतो मधिच,

             तुझी काळजी रात्रभर      
            सतावत राहते उगीच.


तू का इतक्या लवकर
सोडून गेलीस गाव माझं,

             'आईविना पोर' असं
            घेतात लोकं नाव माझं.


वरवरच्या पदार्थांची मला
चवच लागत नाही,

                       काय करू तुझ्या दुधाविना माझी भूकच भागत नाही.



पोरकेपणाची माझ्या भोवती
का ठेऊन गेलीस जाळ,

                       का खरंच इतकी कच्ची                   होती, तुझ्या माझ्यातली नाळ.



तिथं कुणी आहे तुझ्याशी
बोलायला भरपूर,

                 उगाच रडत राहू नकोस
                दाबून स्वतःचा  ऊर.


 बघ आई आता मी
रडत नाही पडलो तरी,

              मला ठावूक आहे तू
             गेली आहेस  देवाघरी.


भूक लागली तरी
बिलकूल मी रडत नाही,

              कारण मी हसल्या शिवाय
              तुला चैन पडत नाही.


पण रोज रात्र झाली कि तुझ्या आठवणींचा थवा येतो,

                     अंथरुणात लपून,  पुसून डोळे, मी गप्प झोपी जातो.



 बघ तुझं बाळ किती
समजूतदार झालं आहे,

               आणि वय कळण्याआधी  
               वेडं वयात आलं आहे.



अजिबात म्हणजे अजिबात
त्रास देत नाही पप्पाला,

               तुझी काळजी तेवढी मात्र घ्यायला सांग बाप्पाला.


 आणि सांग कि
हे शहाण बाळही आहे हट्टी,

                  जर का काही झालं तुला तर घेईल म्हणावं कट्टी.



 मी आता थकलोय
तुला ढगांमध्ये पाहून,

                  ये आता भेटायला    
               नजर तिथली चुकवून.



जमलं जर का सुट्टी घ्यायला
तर ये निघून अशीच,
           
          पोट भरतं ग रोज
       पण मायेची भूक अजून तशीच....
           
             मायेची भूक अजून तशीच....
           
             मायेची भूक अजून तशीच....🙏
आईची किम्मत हि ती नसल्यावरच कळनार्याला कळते  म्हनुन,,,,
त्या माउलीची तिच्या हयातीतच सेवा करा आणि आईला दु:ख देउ नका !
मंजिल ना मिले तब तक हिम्मत मत हारो और ना ही ठहरो....
क्योंकी,
पहाड़ से निकलने वाली नदियों ने आज तक रास्ते में किसीको नहीं पूछा...
 के भाई समन्दर कितना दूर है ?
"माणूस, राग जितक्या सहजतेने
व्यक्त करतो, तितक्याच
सहजतेने प्रेमही व्यक्त करू शकला असता तर जगायला
खरंच किती मज्जा आली
असती...
कारण माणसाच्या निम्म्या
समस्या ह्या व्यक्त केलेल्या
रागामुळे...
आणि कधीच व्यक्त न
केलेल्या प्रेमामुळे वाढतात....
शब्द बोलताना शब्दाला धार नको तर आधार असला पाहिजे.....
कारण धार असलेले शब्द मन कापतात आणि आधार असलेले शब्द मन
जिंकतात....!"